Mantralaya Open For Public : मंत्रालय सर्वांसाठी खुले, नागरिकांची कामे करण्यासाठी रिघ - मंत्रालय
मुंबई - कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १६ मार्च २०२० ला आदेश काढून सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश बंद केला होता. मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर नियमांच्या आधारे मंत्रालयासह शासकीय कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांना अटी शर्तीच्या धर्तीवर मर्यादित उपस्थितीत प्रवेश देण्यात येऊ ( After corona c to general public ) लागला. मंत्रालयाबाहेरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही प्रवेशाला बंदी होती. तसेच अतिमहत्त्वाच्या आणि तातडीच्या बैठकीसाठी मंत्रालयात प्रवेश दिला जात होता. आता कोरोना संसर्ग पूर्ण ओसरल्यानंतर सर्वसामान्यांना मंत्रालयात आजपासून प्रवेशाचा मार्ग खुला करण्यात आला आहे. शासन दरबारी तक्रारी मांडता येतील गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे मंत्रालयात गाऱ्हाणे मांडता येत नव्हते. आता प्रवेश खुला झाल्याने आमच्या समस्या राज्यशासनाच्या दरबारी मांडता येतील, असे सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या राकेश मोरे यांनी सांगितले.