महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Aditya Thackeray reaction फक्त घाणेरडं नाही, खूप घाणेरडं राजकारण गद्दारांनी केले-आदित्य ठाकरे

By

Published : Oct 14, 2022, 1:07 PM IST

मुंबई अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी Andheri East Legislative Assembly by election उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आहेत. ऋतुजा लटके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे अनेक नेते आता अंधेरीत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी अंधेरीत आले आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत ईटीव्ही भारतने संवाद Aditya Thackeray reaction साधला. यावेळी ईटीव्ही भारतशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की आम्हाला हे जे नवीन मशाल चिन्ह मिळाले. या निवडणुकीत तुम्हाला दिसेल ही मशाल कशाप्रकारे उजेड पाडेल. मध्यंतरीच्या काळात या उमेदवारीवरून घाणेरडे नाही फार घाणेरडे राजकारण करण्यात आलं. माझं या गद्दारांना अजूनही आव्हान आहे त्यांनी राजीनामे Aditya Thackeray criticizes Shinde government द्यावेत. आणि बीएमसी सोबतच पोट निवडणुकीला देखील सामोरे जावं. त्यावेळी आम्ही दाखवून देऊ खरी शिवसेना कोणती. अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली Aditya Thackeray reaction to new election symbol आहे

ABOUT THE AUTHOR

...view details