डाकीण असल्याच्या संशयावरून महिलेचा छळ, अपर पोलीस अधीक्षकांनी दिली गुन्हा दाखल करण्याची सूचना - डाकीण असल्याच्या संशयावरून महिलेचा छळ
नंदुरबार - डाकीण असल्याच्या संशयावरुन एका महिलेचा विवस्त्र करुन छळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला ( Suspicion of Black Magic ) आहे. याबाबत मोठी टिकेची झोड उठत आहे. बोली भाषेवरुन घटना सातपुडा पर्वत रांगामधील असल्याची शक्याता वर्तवली जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे समितीचे सरचिटणीस विनायक सावळे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आले असून पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत अपर पोलीस अधीक्षकांनी सूचना ( Additional Superintendent of Police ) दिली आहे. अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी हा व्हिडिओ व्हायरल करू नका, असे आवाहन केले आहे. तसेच याबाबात सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस करत असून कोणालाही काहीही माहिती असल्यास याबाबत पोलिसांना कळवावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.