महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

गुलाबराव पाटील ध्वजारोहण करताना महिलेचा पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न - गुलाबराव पाटील जळगाव ध्वजारोहण

By

Published : Aug 16, 2022, 7:50 AM IST

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला A woman tried to set herself on fire . महिलेने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला set herself on fire by pouring kerosene. पोलिसांनी वेळीच महिलेला रोखले. त्यामुळे अनर्थ टळला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. वंदना सुनील पाटील असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे Vandana Patil Suicide attempt. संबंधित महिला व तिच्या पतीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिनाभरापासून उपोषण सुरू होते. पण प्रशासन दखल घेत नसल्याने महिलेने हे कृत्य केल्याची माहिती आहे. जामनेर येथील काही धान्य व्यापाऱ्यांनी त्यांच्या शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. ध्वजारोहण सोहळ्यावेळी वंदना पाटील यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली Gulabrao Patil flag in Jalgaon होती.

ABOUT THE AUTHOR

...view details