A Wild Elephant Entered School : जंगली हत्तीने घातला शाळेत धुमाकूळ; पाहा व्हिडिओ
कर्नाटक - कर्नाटकातील यलंदुरु तालुक्यात हत्तीने धुमाकूळ घातला आहे. येथील बिलीगिरीरंगा टेकडी जवळील मोरारजी देसाई निवासी शाळेत जंगली हत्ती घुसला. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन फटाके फोडले. फटाक्याच्या आवाजाने हत्ती जंगलात निघून गेला. मात्र, हत्ती शाळेत घुसल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्य़ा प्रमाणात व्हायरल होत ( A Wild Elephant Entered School ) आहे.