महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग - चारोटी टोलनाका

By

Published : May 6, 2022, 12:58 PM IST

पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. राष्ट्रीय महामार्गावर चारोटी टोलनाक्यावर धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला व ट्रकला आग लागली. ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच ट्रकचालकाने ट्रक रस्त्यावरून काहीसा बाजूला सारला व चालक वेळीच ट्रकमधून बाहेर पडल्यान सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. अग्निशमन दल व आयआरबीच्या पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने ट्रकला लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे ट्रकला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ट्रकसह साहित्य पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details