गर्भवती महिलेला मानवी तस्करांनी नोकरीच्या अमिषाने वेठीस धरले - जुमई येथील गर्भवती महिलेची घटना
जमुई (बिहार) - बिहारमधील जमुई येथील एका गर्भवती महिलेला मानवी तस्करांनी ओमानमधील मस्कत नोकरीच्या बहाण्याने ओलीस ठेवले आहे. महिलेच्या सुखरूप सुटकेसाठी तिचे नातेवाईक विनवणी करत आहेत. वसीम आणि सन्नो सय्यद नावाच्या दोन मानवी तस्करांनी 30 वर्षीय गर्भवती महिला लक्ष्मी यांना ओमानमध्ये कैद केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यांचा पासपोर्ट आणि मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. ओमानमध्ये त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. तब्येत बिघडली आहे पण औषध दिले जात नाही अशीही माहिती समोर आली आहे.