VIDEO : बिबट्याने कुत्र्यावर केला हल्ला, झटापटीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद - मुंगसरे गाव बिबट हल्ला
नाशिक - मुंगसरे गावात बिबट्याचा मुक्तसंचार दिसून आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रा ठार झाला असून, बिबट्या आणि कुत्र्याच्या झटापटीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभागाकडून या भागात सर्च ऑपरेशन होत आहे. मुंगसरे येथील शेतकरी किशोर उगले यांच्या घराच्या आवारात ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभागाकडून या भागात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. मुंगसरे गावात बिबट्या वस्तीत घुसला. त्याने एका पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. बिबट्या कुत्र्यावर हल्ला करत असल्याचे दिसून आले असून नंतर काहीतरी आवाजाने बिबट्याने धूम ठोकली. उप वनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सांगितले की, या भागात बिबट्याचा वावर वाढला असल्याने मुंगसरे गावातील लोकांना आम्ही रात्री घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
Last Updated : Jun 7, 2022, 1:23 PM IST