महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

firing In Panchkula: पंचकूल येथे नाईट क्लबमध्ये दोस्तावर गोळीबार; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - Shooting at a nightclub in Panchkula

By

Published : Jul 5, 2022, 3:10 PM IST

पंचकूला (हरियाणा) - हरियाणातील पंचकुला येथील नाईट क्लबबाहेर रविवारी (दि. ३ जुलै)रोजी सकाळी गोळीबाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. (firing In Panchkula ) आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये एक तरुण गोळीबार करताना दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुण मोहित आणि नाईट क्लबविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. असे सांगितले जात आहे की, आरोपी मोहित शनिवारी रात्री पंचकुलाच्या सेक्टर-11 येथील कोको कॅफे अँड लाउंजमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टीसाठी आला होता. रविवारी सकाळी हे लोक क्लबमधून बाहेर आले तेव्हा मोहितने त्याच्या मित्रावर गोळीबार केला. गोळी पायाला लागली आणि हा गोंधळ पाहून नाईट क्लबचे बाउन्सरही धावून आले. तेव्हा मोहितने त्यांच्यावरही गोळीबार केला. ( Shooting at a nightclub in Panchkula ) यादरम्यान एक बाउन्सरही जखमी झाला आहे. दरम्यान, ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details