Video : चारचाकी कोसळली थेट दुधगंगा नदीत; चालकाला रेस्क्यू करून वाचवले - दुधगंगा नदीत चारचाकी कोसळली
कोल्हापूर : कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील दानवाड ते कर्नाटकातील एकसंभाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहन थेट दुधगंगा नदीत गेल्याची घटना घडली आहे. काल गुरुवारी ही घटना घडली असून वाहन चालकाला रेस्क्यू करून काढण्यात आले आहे. या गंभीर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परसगोंडा पाटील आणि प्रशांत पाटील हे दोन माजी सैनिक सकाळी वॉकिंगसाठी गेले असता त्यांना ही घटना दिसताच त्यांनी तात्काळ दोरीच्या साहाय्याने तात्काळ ड्रायव्हरला बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
Last Updated : Jul 15, 2022, 9:38 PM IST