Indian Independence Day हिरवळीने नटलेल्या किल्ले लळींग इथे साकारला ७५ चा आकडा - azadi ka amrit mahotsav
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव azadi ka amrit mahotsav अगदी ग्रामीण भागापासून मोठ्या शहरापर्यंत विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. धुळ्यात देखील या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात मॅरेथॉन स्पर्धा असू दे सायकलिंग असू दे कि हेरिटेज वॉक असू दे धुळेकरांचा Dhule उत्साह या सर्व ठिकाणी दिसून आला. सध्या श्रावण महिना देखील सुरु आहे. बालकवींच्या श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या कवितेची आठवण होते. हिरवळीने नटलेल्या धुळे शहराजवळील किल्ले लळींग Laling Fort याठिकाणी धुळे तहसील कार्यालयाच्यावतीने शुक्रवारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते Heritage Walk On Azadi Ka Amrit Mahotsav . यात धुळे तहसील कार्यालय प्रांताधिकारी कार्यालय तसेच प्रकल्प अधिकारी कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथील कर्मचारी तसेच नागरिकांचा देखील सहभाग होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त Indian Independence Day मानवी साखळीतून ७५ चा आकडा साकारण्यात आला होता. पाहू या ड्रोनच्या माध्यमातून हे विहंगम दृश्य.