महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : शेतकऱ्याची कमाल.. बैलांऐवजी नांगराला जुंपल्या मेंढ्या.. नांगरणीही केली पूर्ण - domestic sheep

By

Published : Jul 5, 2022, 1:31 PM IST

हावेरी (कर्नाटक): एक शेतकरी आपली दीड एकर जमीन वेगळ्या पद्धतीने नांगरत आहे. सावनुरु तालुक्यातील जल्लापूर गावातील शेकाप्पा कुरुबर हे शेतकरी गेल्या 9 महिन्यांपासून आपल्या शेतजमिनीमध्ये कनका आणि रायण्णा नावाच्या पाळीव मेंढ्यांचा वापर शेतीच्या नांगरणीसाठी करत ( Farmer ploughing land by domestic sheep ) आहेत. त्यांनी प्रत्येकी 6500 रुपयांना मेंढीची जोडी खरेदी केली. सुरुवातीला या मेंढ्यांना पाण्याच्या गाड्या, बैलगाड्या ओढून प्रशिक्षित केले जायचे. सामान्यतः बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी केला जातो. मात्र या दोन मेंढ्या जमीन नांगरून शेतकरी शेकाप्पाला मदत करत आहेत. या पाळीव मेंढ्यांचे काम पाहून इतर शेतकरीही आश्चर्यचकित झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details