Rahul Deshpande : शास्त्रीय गायक राहुल देशपांडेला पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार; म्हणाले, 'तुमची दखल घेतली जाते तेव्हा...' - राहुल देशपांडे 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मराठी बातमी
पुणे - 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची ( 68 th national film awards ) घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका वाजताना दिसत आहे. गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, पार्श्वगायनात राहुल देशपांडे ( Rahul Deshpande ) यांनी बाजी मारली आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्काराना सन्मानित करण्यात आलं आहे. शास्रीय गायक राहुल देशपांडेला 'मी वसंतराव' सिनेमाच्या पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल देशपांडे यांच्याशी 'ईटिव्ही भारत'ने संवाद साधला आहे.