Eknath Shinde : शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत : गुवाहाटीला पोहोचताच एकनाथ शिंदेंचा दावा - Eknath Shinde Claims
गुवाहाटी ( आसाम ) : शिवसेनेत बंडखोरी करून आपल्या समर्थक आमदारांसह नाराज असलेले मंत्री एकनाथ शिंदे हे आसामची राजधानी गुवाहाटी येथे दाखल झाले ( Eknath Shinde arrives in Guwahati ) आहेत. तेथे एका हॉटेलमध्ये या सर्व आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुवाहाटी विमानतळावर पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत गुवाहाटीमध्ये दाखल झाले असल्याचे ते म्हणाले. तसेच मी कुणावरही टीकाटिप्पणी करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्त्व आम्ही पुढे घेऊन जाणार असे शिंदे ( Eknath Shinde Claims ) म्हणाले.
Last Updated : Jun 22, 2022, 8:07 AM IST