महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Hindu Muslim Unity : वाशिम कारागृहात 32 हिंदू - मुस्लिम कैद्यांनी ठेवले रोजे - वाशीम जिल्हा कारागृह

By

Published : Apr 17, 2022, 5:27 PM IST

वाशिम : मुस्लिम समाजाचा पवित्र असलेला रमजान महिना सुरू ( Ramadan 2022 ) असताना राजकीय मंडळींकडून मशिदीवरील भोंगे ( Loudspeaker Politics In Maharashtra ) काढण्याच्या विधानामुळे महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. मात्र, दुसरीकडे वाशिम कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या हिंदू कैद्यांनी मुस्लिम कैद्यांसह रोजे पकडून ( Hindu Muslim Prisoners Are Fasting ) अशा राजकारण करणाऱ्यांना जोरदार चपराक दिल्याचे दिसून येत ( Hindu Muslim Unity ) आहे. दरम्यान सद्यस्थितीत वाशिम कारागृहात 32 हिंदू - मुस्लिम कैद्यांनी रोजे ठेवले आहेत. वाशिम जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेले हिंदू बांधव मुस्लिम बांधवासोबत रोजे करत आहेत. त्यामुळं कारागृहात सर्वधर्म समभाव असल्याचं चित्र आहे. दरम्यान जिल्हा कारागृह प्रशासनाकडून रोजे करणाऱ्यांना सर्व आवश्‍यक सुविधा देण्यात येत आहेत. विशेष बाब म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही कैदी हे रोजे करत असून कारागृहात हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details