Mirchi Baba: 'काली' चित्रपटावरुन मिर्ची बाबा भडकले; म्हणाले, यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 20 लाख देणार - काली चित्रपटावर मिर्ची बाबाचा व्हायरल व्हिडीओ
ग्वालियर (मध्य प्रदेश) - नेहमी चर्चेत राहणारे महामंडलेश्वर स्वामी वैरागानंद गिरी महाराज, धर्मगुरू मिर्ची बाबा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे मिर्ची बाबाने म्हटले आहे. यासंदर्भात मिर्ची बाबा यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये ते सांगत आहेत की हे एका षड्यंत्राखाली होत आहे. अशा लोकांचा शिरच्छेद केल्याशिवाय ते मान्य करणार नाहीत. 'काली' चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरवर मिर्ची बाबा म्हणाले की, हिंदू धर्माला बदनाम करण्याचे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. माँ कालीचा अपमान होत आहे. निरंजनी आखाड्याचा संत असल्याने मी जाहीर करतो की, असे चित्रपट बनवणाऱ्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला मी 20 लाख रुपये देईन. आश्रम या वेब सीरिजचे निर्माते हिंदू धर्मावर आघात करत आहेत असही ते म्हणाले आहेत.