महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Hinganghat Arson Case : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडित प्राध्यापिकेची आज दुसरी पुण्यतिथी, आजच निकालाची शक्यता - Hinganghat District and Additional Sessions Court

By

Published : Feb 10, 2022, 1:35 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

वर्धा : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील (Hinganghat arson case) पीडित प्राध्यापिकेची आज दुसरी पुण्यतिथी आहे. दोन वर्षांपूर्वी आरोपी विकेश उर्फ विकी नगराळेने तिला हिंगणघाट मधील नंदुरी चौकाजवळ पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. आठ दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारी 2020 रोजी तिचा मृत्यू झाला होता. तिच्या दुसऱ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने न्यायालयात निघण्याच्यापूर्वी पीडितेच्या आई-वडीलानी घरी आपल्या लेकीचे स्मरण करत तिला श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे आज पीडितेच्या पुण्यतिथीच्या दिवशीच हिंगणघाट मधील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (Hinganghat District and Additional Sessions Court) आरोपी विकेश नगराळेला (Vikesh Nagarale accused Hinganghat case) शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाने काल विकेश नगराळेल हत्याप्रकरणात दोषी असल्याचे जाहीर केले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details