VIDEO : गेट वे ऑफ इंडिया येथे बॉम्बस्फोटाची थरारक रंगीत तालीम
मुंबई - मुंबईच्या सुप्रसिद्ध व पर्यटकांची गर्दी असलेल्या गेट वे ऑफ इंडिया येथे शुक्रवारी दुपारी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाकडून पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला देण्यात आली. पोलीस, अग्निशमन दल, बॉम्ब डिटेक्शन स्कॉड आदी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी त्वरित बचाव कार्य राबवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईमध्ये अशा घटना घडल्यास सर्व यंत्रणांचा समन्वय असावा म्हणून एकत्रित मॉकड्रिल घेण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून ( Mock Drill at Gateway of India in mumbai ) देण्यात आली. शुक्रवारी दुपारी 'गेटवे ऑफ इंडिया' परिसरात आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने बॉम्बस्फोट, शोध पथक, बचाव कार्य आदी बाबींचा एकत्रित सराव करण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST