Meghnath Yatra In Melghat : मेळघाटातील मेघनाथ यात्रेत नवस फेडण्याची थरारक प्रथा, पाहा व्हिडिओ
अमरावती - मेळघाटातील आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा सण असणाऱ्या होळी निमित्त कातकुंभ गावालगत मेघनाथ यात्रा ( Meghnath Yatra In Melghat ) भरते. येथे नवस फेडण्यासाठी 45 फूट अंतरावर एका लाकडी खांबावर आडव्या बांधलेल्या बल्लीवर झोपून डावीकडे तीनवेळा आणि उजवीकडे तीनवेळा झोका ( The thrilling practice of paying vows ) घेतात. अतिशय थरार आणणारा हा प्रकार अंगावर शहारे आणणारा आहे. या यात्रेत पुरुष आणि महिला आपली इच्छा पूर्ण होण्यास मेघनाथाला नवस बोलतात. आपली इच्छा वर्षभरात पूर्ण होताच पुरुष आणि महिला अशा प्रकारे नवस फेडतात. हवेत चित्तथराक असा नवस फेडला जात असताना खाली जमिनीवर आदिवासी बांधव संगीत, वाद्य आणि नृत्य करून जल्लोष करीत असतात. या यात्रेत अनेक पिढ्यांपासून नवस फेडण्याची अशी थरारक प्रथा आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST