The Car Caught Fire : कोल्हापूर शहरात मुख्य रस्त्यावर कारने घेतला पेट - कोल्हापूरमध्ये कारने घेतला पेट
कोल्हापूर शहरातल्या महासैनिक दरबार हॉल येथील मुख्य रस्त्यावर आज रात्रीच्या वेळी बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. कसबा बावड्याच्या दिशेने चाललेल्या वेरना कारने अचानक पेट घेतला. बघता-बघता संपूर्ण कारला आग लागली. (The Car Caught Fire) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून चालक मात्र थोडक्यात बचावले आहेत. यावेळी बसबा बावड्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली होती. दरम्यान, अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येत आग विझवली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST