हृदयाचा ठोका चुकवणारा Video; रेल्वे फाटक तोडून टेम्पो सरळ रेल्वे रुळावर! - tempo railway crossing accident in mumbai
मुंबई - ठाणे जिल्ह्यातील आसनगाव ते आडगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक जवळजवळ हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडलेली आहे. चक्क एक टेम्पो रेल्वे फाटक तोडून रेल्वे ट्रॅक जवळ आलेला होता. मात्र सुदैवानं या दुर्घटनेत टेम्पो थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के सिंग यांनी सांगितले की, हा व्हिडिओ जुना आहे. पनवेल गोरखपुर एक्सप्रेस जेव्हा जात होती. तेव्हा रेल्वे फाटक बंद करण्यात आलेले होते. मात्र फाटकाजवळ एक टेम्पो अचानक रेल्वे फाटक तोडून रेल्वे रुळावर आला होता. वाहन चालका विरोधात आम्ही गुन्हा नोंदविला आहे. विशेष म्हणजे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की रेल्वे फाटक बंद असल्यास रेल्वे रूळ ओलांडू नयेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST