VIDEO : तेंलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी घेतली शरद पवारांची भेट - telangana cm kcr in mumbai
मुंबई - कोणतीही राजकीय अस्पृश्यता न बाळगता देशातील समविचारी पक्षांची मोट बांधणे आवश्यक आहे. केंद्रातील अन्यायी सरकारच्या विरोधात एकसंघ होऊन लढण्यासाठी आणि परिवर्तन करण्यासाठी याची गरज असल्याचं सांगत, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. याचबरोबर आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST