126 वर्षीय योगगुरूंकडून नम्रतेचे दर्शन, पंतप्रधान मोदी अन् राष्ट्रपती कोविंद यांच्यासमोर नतमस्तक होत स्वामी शिवानंद यांनी स्विकारला 'पद्मश्री' - PM Narendra Modi
नवी दिल्ली - राष्ट्रपती भवन येथे सोमवारी (दि. 21 मार्च) पद्म पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. वाराणसीचे रहिवासी असलेले १२६ वर्षीय स्वामी शिवानंद ( Swami Sivananda ) पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवन आले होते. त्यांच्या अंगी असलेल्या नम्रतेचे दर्शन घडवल्याने ते सध्या चर्चेत आहेत. पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या समोर नतमस्तक झाले. त्यानंतर ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind ) यांच्या समोर नतमस्तक झाले, त्यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी त्यांना उठवले व पुरस्कार प्रदान केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शिवानंद आपल्या स्थानावर जाताने ते पुन्हा मोदी यांच्यासमोर नतमस्तक झाले. त्यावेळी मोदी हे जागेवरुन उठत त्यांना उठवले व हातात हात घेत त्यांना नमन केले. नमन ते नम्रता अंगी ! नेघे रंगी पालट ! तुका म्हणे त्यांची नावे ! घेता व्हावे संतोषी ! तुकोबारायांच्या अंभागातील या ओळींची प्रचिती या ठिकाणी आली. सध्या हा व्हिडिओची प्रचंड चर्चा सुरू आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST