Raju Shetti Nagpur : 'आमदार देवेंद्र भुयार यांच्या संदर्भातील तक्रारींवर लवकरच निर्णय घेवू' - स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी आमदार देवेंद्र भुयार प्रकरण
नागपूर - आगामी निवडणुका आणि पक्षवाढीच्या अनुषंगाने तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे नागपूर अमरावती दौऱ्यावर होते. यातच वरुडचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या संदर्भात काही तक्रारी आल्या आहेत. त्यावर सुद्धा पदाधिकारी यांच्याशी बोलून चर्चा करत गरज पडल्यास सगळे ऐकून निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली आहे. शिवाय महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष लोटूनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने 5 एप्रिलच्या बैठकीत निर्णय घेऊ, असेही राजु शेट्टी म्हणाले. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर विश्वास ठेवून आमदार निवडून दिले. त्यामुळे जे झाले ते झाले माझावर विश्वास ठेवा, असेही राजू शेट्टी म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST