यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण - विधान परिषद पोटनिवडणूक 2020
यवतमाळ - विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्ह्यातील वणी, केळापूर, राळेगाव, यवतमाळ, दारव्हा, पुसद, उमरखेड या सात ठिकाणी मतदान घेतले जाणार आहे. मतदान आणि मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधानपरिषदेचे आमदार तानाजी सांवत हे विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे सुमित बाजोरिया लढत आहेत.