BG3 seeds : यवतमाळच्या शेतकऱ्यांचे BG3 बियाणांची लागवड करून आंदोलन
यवतमाळ - जिल्ह्यात सर्वाधिक कपाशी पिकाची लागवड केली जाते. येथील कापूस दर्जेदार असल्याने जगात मागणी आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून कपाशीवर येणार्या बोंडअळीमुळे शेतकरी देशोधडीला लागत आहेत. बोंडअळी टाळण्यासाठी बिजी थ्री बियाण्याच्या मान्यतेसाठी शेतकरी आग्रही आहेत. त्यासाठी जिल्ह्यात काही शेतकर्यांनी बीजी थ्रीची बियाणांची लागवड करून आंदोलन केले. याद्वारे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. बीजी टू तंत्रज्ञान कालबाह्य 'यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे कापसाचा शोध लावल्याचे मानले जाते. देशात सर्वात मोठा कापूस उत्पादक जिल्हा यवतमाळ आहे. परंतु सध्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी निराशेत आहेत. बीजी टू तंत्रज्ञान कालबाह्य झाले आहे. त्यातच, सरकारने व कंपन्यांनी बोंडअळी येईल, असा केलेला दावा फोल ठरला आहे. बोंडात अवघ्या काही दिवसांत गुलाबी बोंडअळी दिसून येते. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाची मागणी करत आहेत. जिल्ह्यात आंध्र व तेलंगणातून बियाणे तस्करी होतात. हेच बियाणे शेतकरी लावतात. त्यामुळे शेतकर्यांसह शासनाचेही नुकसान होत आहे. शेतकर्यांना सुरक्षा मिळत नाही. यामुळे काही शेतकरी बोल्डगॉन थ्री बियाणे लावून आंदोलन केले. एकीकडे सरकार जय जवान जय किसानचा नारा देताना दिसते. 2024 पर्यंत दुप्पट उत्पादनाचे आश्वासन दिले जाते. त्या शेतकर्यांच्या मागे सरकार उभे राहत नाही. बीजी थ्री तंत्रज्ञानाला मान्यता देण्यासाठी सरकारने लक्ष दिले पाहिजे', अशी शेतकर्यांची आग्रही मागणी आहे.