VIDEO : जिल्हा रुग्णालयाचे कामकाज ठप्प, शिकाऊ डॉक्टर संपावर; डीनच्या राजीनाम्याची मागणी - अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे
यवतमाळ - वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय येथील शिकाऊ विद्यार्थी डॉ. अशोक पाल हत्या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील विद्यार्थ्यांनी आज सकाळपासून रुग्णालयाचे दोन्ही गेट पूर्णपणे बंद केले. या आंदोलनात 700 विद्यार्थी, दीडशे प्रशिक्षणार्थी यासह इतरही सहभागी झाले. आंदोलकांकडून अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येणार नाही, तोपर्यंत रुग्णालयात कुठल्याच प्रकारचे रुग्ण आत सोडण्यात येणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी जिल्हा पोलीस प्रशासन, रुग्णालय प्रशासन तसेच जिल्हाधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रसंगी जिल्हा रुग्णालयाबाहेर रूग्णवाहिकांची रांग लागली होती. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची तारांबळ उडाली.