साकीनाका घटनेतील पीडितेच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत करणार- यशोमती ठाकूर - sakinaka physical abuse case
अमरावती - मुंबईतील साकीनाका येथील बलात्कार घटनेतील पीडितेच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत करणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. मुंबईपाठोपाठ अमरावतीमध्येही महिला अत्याचाराची घटना घडली आहे. समाजातील विकृत लोकांवर नक्की कठोर कारवाई केली जाईल. मात्र, अशा घटनांना जर आळा घालायचा असेल तर महिलांनी खंबीर असणे गरजेचे असल्याचे मत महिला व बालकल्याण मंत्र्यांनी व्यक्त केले.