नवरात्रोत्सव दुसरा दिवस : अंबाबाईची माहेश्वरी मातृका रुपात पूजा - Worship of Ambabai as Maheshwari Matrika kolhapur
कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या अंबाबाईची माहेश्वरी मातृका रुपात पूजा बांधण्यात आली आहे. द्वितीय मातृका माहेश्वरी ही भगवान शंकराची शक्ती आहे. ही नंदीवर आरूढ असून तिला चार हात व त्रिनेत्र आहेत. तिच्या हातात त्रिशूल, डमरू, माळा, वाडगा आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात अंबाबाईची विविध रुपात पूजा बांधण्यात येते. ही पूजा पाहण्यासाठी तसेच अंबाबाईच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील भाविक येत असतात. आजसुद्धा अंबाबाईची माहेश्वरी मातृका रुपात पूजा बांधण्यात आली असून ही पूजा अरुण मुनिश्वर, सोहम मुनिश्वर आणि सुकृत मुनिश्वर यांनी बांधली आहे.
TAGGED:
नवरात्रोत्सव दुसरा दिवस