वर्ल्ड सोशल मीडिया डे 2021 निमित्ताने रंजक माहिती - सोशल मीडिया डे 2021
नवी दिल्ली - तरुण असो की वृद्ध, प्रत्येकजण सोशल मीडियाशी कनेक्ट आहे. सोशल मीडिया आज जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. फक्त एका क्लिकने, आता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीशी संपर्क साधला जाऊ शकतो. हे सर्व सोशल मीडियाद्वारे शक्य झाले आहे. आज आपण 'सोशल मीडिया डे' साजरा करीत आहोत. दरवर्षी 30 जून रोजी 'सोशल मीडिया डे' साजरा केला जातो. या निमित्ताने सोशल मीडियाशी संबंधित मजेदार गोष्टींबद्दल जाणून घेऊया...