मुंबईतील मेट्रो प्रकल्पांचे काम जोरात सुरू; सराव फेरी लवकरच - मुंबई मेट्रो प्रकल्पांचे काम
मुंबईतील मेट्रो प्रकल्पांचे काम जोरात सुरू आहे. यापैकी मेट्रो-2 ए या मार्गिकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. फेब्रुवारीत महिन्यात या दोन्ही मार्गांवर मेट्रोची सराव फेरी होणार आहे. त्यासाठी बुधवारी रात्री बंगळुरूहून मानवरहित मेट्रोचे डबे मुंबईत दाखल झाले. एमएमआरडीने याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. मे 2021 पासून मेट्रो-2 ए आणि मेट्रो-7 ची सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचे एकनाथ शिंदे यांनी नुकतेच सांगितले होते. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बंगळुरूला जाऊन मेट्रो डब्यांची पाहणीही केली होती. त्यानंतर हे डबे मुंबईत आणण्यात आले.फेब्रुवारीत सराव फेरीला सुरुवात होईल. त्यानंतर एकूण 576 कोचेस टप्प्याटप्याने मुंबईत दाखल होतील. या दोन्ही मार्गांवरची मेट्रो चालकविरहीत असेल. मात्र, सुरुवातीला चालकासह मेट्रो चालवली जाईल. त्यानंतर अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर चालकाविना मेट्रो सुरू होईल. भारतातच मेट्रो डब्यांची बांधणी होत असल्यामुळे प्रत्येक डब्यामागे दोन कोटी रुपयांची बचत झाली आहे.