अर्रर्र... पडली... मुंबईत मॅनहोलमध्ये पडली महिला, VIDEO झाला व्हायरल - mumbai waterlogging
मुंबई - गेल्या दोन दिवसापासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. हिंदमाता, सायन सर्कल आणि कुर्ला याठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली आहे. या काळात सोशल मिडीयावर एक व्हिडीयो प्रचंड व्हायरल झाला आहे. अंधेरी पश्चिम येथील डीएन नगर मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या मॅनहोलमध्ये एक महिला पाय घसरून पडली आहे. यात एक महिला हातात छत्री घेऊन जात असताना तिचा पाय मॅनहोलमध्ये अडकला. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली. अशा प्रकारच्या घटनांमध्ये संबंधित व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
Last Updated : Jul 17, 2021, 3:11 PM IST