चालत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेचा गेला तोल, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
मुंबई - लोकल ट्रेनमध्ये(Mumbai Local Train) चढताना एका महिलेचा तोल गेला आणि ती खाली पडली. हे पाहून तेथील रेल्वे कर्मचाऱ्याने(Railway Police) त्या महिलेकडे धाव घेतली आणि तिला बाहेर ओढले. त्यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले आहेत. ही घटना रविवारी भायखळा रेल्वे स्थानकावर(Byculla railway station) घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झाली आहे.