एक डोस घेतलेल्यांना दिवाळीनंतर सवलत देण्याचा निर्णय चर्चा करून घेऊ - आरोग्यमंत्री राजेश टोपे
जालना - आत्ताच दसरा झाला असून दिवाळीनंतर कोरोना बाधितांची संख्या कमी राहिली आणि कोविड अॅप मध्ये तुमची स्थिती जर स्थिर असेल तर उघडलेल्या क्षेत्रामध्ये काही सवलती देता येईल का याबाबतीत चर्चा करुन दिवाळीनंतर निर्णय घेणार, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सध्या कोविशिल्ड लसींमधील दोन डोसचे अंतर हे 84 दिवसांचे आहे. त्यामुळे लोकांना असुविधा होते. सवलत देण्याबाबत टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या अधिअकरी आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री टोपे म्हणाले.
Last Updated : Oct 17, 2021, 4:52 PM IST