पोलिसांवर कुणाचा दबाव आहे? आमदार प्रसाद लाड यांची राणे यांच्या अटकेवर प्रतिक्रिया - narayan rane case
रत्नागिरी (संगमेश्वर) - कार्यकर्त्यांमध्ये कोणतीही झटापट झाली नाही. मी, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे पोलिसांना सांगत होतो. की, तुम्हाला राणे यांना अटक करायची असेल तर त्यांना अगोदर जेवण करूद्या. त्यांच्या बीपीच्या गोळ्या चालू आहेत. तसेच, त्यांचे रोजचे चेकपही झालेने नाही. त्यामुळे या चेकपसाठी डॉक्टर येत आहेत. ते चेक करुद्या अशी विनंती आम्ही पोलिसांना केली. मात्र, पोलिसांनी आमचे काही ऐकले नाही. आम्हाला वरुन दबाव आहे. असे म्हणत पोलिसांनी राणे यांना ताब्यात घेतले अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.