अर्थसंकल्पाकडून 'आरएसएस'ला काय हवं? पाहा...
नागपूर - आज अर्थात 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पावर संघ परिवारातील संघटनांचा प्रभाव राहण्याची शक्यता कमी असून हा अर्थसंकल्प लोकप्रिय अर्थसंकल्प राहण्याची शक्यता असल्याचं मत संघ विचारक व अर्थतज्ज्ञ दिलीप देवधर यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारने संघाच्या बऱ्याच अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. नोटबंदी, जीएसटीपासून भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात टाकण्याचं काम सरकारने केलं आहे. गॅस कनेक्शन, पंतप्रधान आवास योजना यासारख्या आर्थिक कल्याणकारी योजना केंद्र सरकारने राबवल्या आहेत. पंतप्रधान म्हणून मोदींसाठी ही परीक्षेची वेळ आहे. संघाचा कार्यक्रम मोदींनी राबवला आहे. आता आर्थिक स्थितीवर केंद्राने कार्य करावे, अशी इच्छा संघाची असल्याचे देवधर यांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले.