वसईत सुरुची बीचवर आढळला भला मोठा व्हेल मासा - vasai of palghar district
वसई (पालघर) - वसईतील सुरुची बीच येथील समुद्र किनारी मंगळवारी (दि. 21 सप्टेंबर) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भला मोठा व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. साधारण 30 फूट लांब तर 12 फूट रुंद असलेल्या या व्हेल माशाचा मृत्यू नैसर्गिक अवस्थेत झाला आहे की आणखीन कोणत्या कारणास्तव याचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबत व्हेल माशाचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वन विभागाला कळविण्यात आल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली आहे. बुधवारी (दि. 22) सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा उलगडा होणार आहे. त्यानंतर त्याला समुद्रकिनारी वाळूत पुरण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक कर्पे यांनी सांगितले.