२०२४ मध्ये संपणार कोरोना, हॉटस्पॉटमध्ये १०० टक्के लसीकरणाची गरज -डॉ. राहूल पंडित - corona till 2024
मुंबई - सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात बहुतांश रुग्ण सौम्य स्वरुपाच्या कोरोनाने ग्रस्त आहेत. लोकांना आता कोरोनाचा सराव झालाय, असे म्हणता येऊ शकते. कोरोना झाला तर काय करावे हे लोकांना माहित आहे. तसेच गेल्या वर्षभरात वैद्यकिय यंत्रणेला कोरोनावरील उपचारांचा मोठा अनुभव आला आहे. पहिली लाट आली तेव्हा रुग्णांवर उपचार कसे करायचे, हे एक मोठे आव्हान होते. तेव्हा मृत्यूचे प्रमाण जास्त होते. आयसीयूमधील रुग्णांची संख्या जास्त असल्याने बऱ्याच लोकांनी जीव गमावला लागाला. आता तशी परिस्थिती नाही. केवळ मृत्यूचे प्रमाण कमी झाले नाही, तर रुग्ण बरे होण्याची संख्याही आपण वाढवू शकलो असल्याचे फोर्टीस हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअरचे डायरेक्टर आणि महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहूल पंडित यांनी सांगितले. तसेच कोरोनाला संपुष्टात आणण्यासाठी सुमारे २०२४ उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला आधीप्रमाणे जगता येईल. तोवर आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल, असेही ते म्हणाले.
Last Updated : Mar 15, 2021, 2:52 PM IST