VIDEO : जळगावात जलवाहिनी फुटली, लाखो लीटर पाण्याची नासाडी - जळगाव जलवाहिनी फुटली
जळगाव - रिंगरोड परिसरात एक जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. बुधवारी (11 ऑगस्ट) दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. बुधवारी सकाळपासून रिंगरोड परिसरात अमृत पाणीपुरवठा योजनेच्या चाऱ्या खोदण्याचे काम सुरू होते. यावेळी जेसीबीमुळे शहरांतर्गत पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. पाण्याचे फवारे कारंज्यांप्रमाणे 12 ते 15 फूट उंच उडत होते. रस्त्यावर पाणीच पाणी झाले. दरम्यान, 'हे काम त्वरित पूर्ण केले जाणार आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही', अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुशील साळुंखे यांनी दिली.