पाणी टंचाईचे भीषण वास्तव; हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांचा जीवाशी खेळ - मोलमजुरी
भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकणातही पाणी टंचाईचे भीषण वास्तव पाहायला मिळत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर उन्हातान्हात काबाडकष्ट करायचे आणि पाण्याच्या एका हंड्यासाठी रात्री पोराबाळांसह विहिरीतील खड्ड्यात साठलेले पाणी भरण्यासाठी रात्र जागवायची, अशी परिस्थिती सध्या रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये गावातल्या पड्यारवाडीतील ग्रामस्थांवर आली आहे. यासंदर्भात पाहा ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट.