मुंबईत सखल भागात साचले पाणी
मुंबई - मुंबईत जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यानुसार काल (दि. 11 जून) रात्रीपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळीही चांगलाच पाऊस पडल्याने मुंबईत सखल भागात पाणी साचले आहे. आज (दि. 12 जून) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास समुद्राला भरती असल्याने हे पाणी शहरातच साचून राहणार आहे. यामुळे नागरिक, वाहन चालक यांना त्रास सहन करावा लागत आहे. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीने...