महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

वाशिम : दुहेरी हत्याकांडातील आरोपींना ठोकल्या बेड्या; वाशिम पोलिसांची कारवाई - मालेगाव तालुक्यातील चाकातीर्थ

By

Published : Sep 25, 2021, 11:34 AM IST

वाशिम : मालेगाव तालुक्यातील चाकातीर्थ येथे 19 तारखेला गजानन निंबाळकर आणि निर्मला निंबाळकर या दाम्पत्याची हत्या घडली होती. घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिलीप रत्ने याला मुंबई येथून तर दुसरा आरोपी विकास राठोड याला डव्हा येथून अटक केली आहे. तसेच आणखी काही आरोपी आहेत का याचा तपास सुरू आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी डव्हा जवळ असलेल्या चाकातीर्थ येथे मंदिरावर रखवालीसाठी असलेल्या गजानन निंबाळकर आणि निर्मला निंबाळकर या वृद्ध दाम्पत्याची चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आली होती. त्यांच्याकडील तीन सोन्याच्या अंगठ्या, मंगळसुत्र व काही चांदीचे दागिने चोरून नेल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच जऊळका पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details