गिर्यारोहक यशने आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावर स्वातंत्र्यदिनी फडकावला तिरंगा - यश इंगोले
वाशीम : वाशीम शहरातील १९ वर्षीय यश मारुती इंगोले या युवा गिर्यारोहकाने आफ्रिका खंडातील ‘किलिमांजारो’ या सर्वात उंच शिखरावर चढाई करून 15 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकावला आहे. आफ्रिका खंडातील किलिमांजारो (उंची : सुमारे ५८९२ मीटर) हे सर्वोच्च शिखर आहे. किलिमांजारो हे जगातील सर्वात उंच शिखरांपैकी चौथ्या नंबरचे शिखर आहे. हे शिखर जगातील एकमेव असे शिखर आहे, ज्याच्या जवळपास लागून दुसरे कोणतेही शिखर नाही. या शिखरावरील तापमान उणे 29 अंश सेल्सिअस इतके असते.