महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

वाशिम : प्रत्येक वेळेस निर्बंध हे शेतकऱ्यावरच लावले जातात; पोळ्याच्या दिनी शेतकऱ्यांची उद्विग्न प्रतिक्रिया - washim pola farmers reactions

By

Published : Sep 6, 2021, 7:41 PM IST

वाशिम - मागील दोन वर्षांपासून कोरोना रोगाचे सावट असल्याने शेतकऱ्यांच्या बैलाचा पोळाच्या सण साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, राज्यात नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्या करता हजारोंची गर्दी चालते. आता प्रत्येक वेळेस निर्बंध हे शेतकऱ्यावर लावले जातात, अशी खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली गेली. त्यामुळे या वर्षीच्या पोळा या सणाला लावलेल्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर आला. भारतीय संस्कृतीमध्ये शेती व्यवसायाला खूप मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या शेतीवर वर्षभर राबणारा सर्जा राजा बैलजोडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभर राबराब राबणारा शेतकऱ्याचा सर्जा राजाला किमान पोळ्याला विश्रांती मिळावी तसेच या बैलजोडीच्या प्रति त्यांच्या श्रमापोठी एक जाणीव म्हणून शेतकरी आपली भावना व्यक्त करीत असतो. मात्र, यावर्षीही हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details