महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची दिंडी, पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मिळतो मान... - rakhumai
महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची दिंडी म्हणून संत मुक्ताईच्या दिंडीची ओळख आहे. जळगाव जिल्ह्यातील कोथळी गावात असलेल्या मुक्ताईच्या जुन्या मंदिरापासून दिंडीला सुरुवात होते. ही दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत ३३ दिवसांत तब्बल ५६० किलोमीटरचे अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते. तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती तसेच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडविली जाते. तर यावेळी संत मुक्ताईला साडीचोळीचा आहेर भावांकडून भेट दिला जातो.