पुण्यात पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी उत्साहात मतदान - पुणे मतदान अपडेट
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. पुणे शहरामध्ये सकाळपासूनच मतदार मतदानासाठी लगबगीने निघाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. विभागात सर्वात जास्त मतदार पुणे शहरात आहेत. मतदान केंद्रांवर कोविड - 19 च्या दृष्टीने सुरक्षा म्हणून सॅनिटायझर, टेम्परेचर स्क्रिनिंग करण्यात येत आहे. मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला आहे, आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी..