विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्याला अॅस्टर फुलांची आकर्षक सजावट - विठ्ठल मंदिराला अॅस्टर फुलांची आरास बातमी
सोलापूर : आज शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने पंढरपूरचे युवा उद्योजक युवराज मुरंबे यांच्यावतीने श्री विठ्ठल मंदिरातील रुक्मिणीमातेचा गाभारा, सोळखांबी तसेच विविध भागांना पांढऱ्या रंगाच्या अॅस्टर फुलांनी आकर्षक पध्दतीने सजवण्यात आले आहे. या पांढऱ्या अॅस्टर फुलांमध्ये सावळा विठुराया आणि रुक्माई मातेचे रूप आणखीनच खुलून दिसत आहे.