पांडुरंगाच्या दरबारात सात महिन्यानंतर दुमदुमला टाळ-मदुंगाचा नाद - undefined
पंढरपूर - वैष्णवांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सात महिन्यानंतर खुले करण्यात आले. विठ्ठल मंदिरामध्ये घटस्थापनेचा घटस्थापनेच्या मुहूर्तावर विठ्ठलाची मुखदर्शन सकाळी सहाच्या सुमारास देण्यात आले. विठ्ठलाच्या मुखदर्शनाचा मान सुमित्रा शंकर जव्हेरी या महिला भाविकाला मिळाला. दर्शन रांगेतून येणाऱ्या भाविकांचे विठ्ठल मंदिर समितीकडून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी गजनान गुरव यांनी उपस्थित होते. विठ्ठल मंदिरात सात महिन्यांनंतर टाळ मृदुंगाचा आवाज घुमला.
TAGGED:
टाळ-मदुंगाचा नाद पंढरपूर