शंभर टक्के कर भरा अन् जिंका लाखोंची बक्षिसे, 'या' ग्रामपंचायतीची अनोखी योजना - अमरावती जिल्हा बातमी
अमरावती - नागरिकांनी मालमत्ता कर भरावा यासाठी विविध योजना ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेकडून करण्यात येते. अमरावती जिल्ह्याच्या वेरुळ रोंघे (ता. धामणगाव रेल्वे) ग्रामपंचायतीने शंभर टक्के घरपट्टी, पाणीपट्टी भरणाऱ्यांच्या नावे लकी ड्रॉ योजने समाविष्ट करणार आहेत. लकी ड्रॉमधून आलेल्या नागरिकांना विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामुळे या ग्रामपंचायतीतील नागरिकांचा कर भरण्याकडे कल वाढला आहे.