#अर्थसंकल्पीय अधिवशन : राज्यातील कायदा व सुवस्थेबाबत देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका - devendra fadnavis law and order
मुंबई - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याप्रसंगी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्यातल्या लोकांना सुरक्षित वाटते का याचा विचार आम्ही आमच्या काळात केला होता. आज ज्या काही गोष्टी घडत आहेत. 2000 दशकाच्या पहिल्या दोन ते तीन वर्षांत एक तेलगी घोटाळा सुरू झाला होता. अजूनही त्याच्या केसेस सुरू आहेत. कंगनाच्या स्टेटमेंटचे आम्ही समर्थन करणार नाही. मात्र, अनिल गोटे यांच्या व्यक्तव्याची दखलसुद्धा राज्य सरकारने घेतली नाही. अनिल गोटे यांनी पोलिसांना शिवीगाळ केली, याचा व्हिडिओही आहे. मात्र, सरकारने याची साधी तक्रारदेखील करून घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला.